शिक्षकांच्या हक्कासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही लढेन : सुधाकर अडबाले • प्रथम आगमनानिमित्त चंद्रपुरात विजयी रॅली

51

शिक्षकांच्या हक्कासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही लढेन : सुधाकर अडबाले

• प्रथम आगमनानिमित्त चंद्रपुरात विजयी रॅली

शिक्षकांच्या हक्कासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही लढेन : सुधाकर अडबाले • प्रथम आगमनानिमित्त चंद्रपुरात विजयी रॅली

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 12 फेब्रुवारी
भाजपचा गड असलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात झालेला माझा विजय हा प्रत्येकाच्या मनातील सरकारच्या विरोधात असलेला आक्रोश आहे. शाळा आणि शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम शासनाने केलेले आहे. आजमितीस ५७ हजार शिक्षकांच्या जागा राज्यात रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाहीत. मराठी शाळांची अवस्था दयनीय आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी यापुढेही रस्त्यावर व सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून लढा सुरू राहील, असा भक्कम विश्वास नवनिर्वाचित शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांनी सत्कार सोहळ्याप्रसंगी शिक्षकांना दिला. येथील गांधी चौक येथे विजयी रॅलीचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळू धानोरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सीमा अडबाले, आ. प्रतिभा धानोरकर, माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे, डॉ. बबनराव तायवाडे, वितेश खांडेकर, राजेंद्र वैद्य, संदीप गिन्हें रामू तिवारी, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, परशुराम धोटे, प्रा. अनिल शिंदे, प्राचार्य सूर्यकांत खनके, प्राचार्य श्याम धोपटे, राजेंद्र खाडे, राजेश नायडू, दिलीप चौधरी, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, ,लक्ष्मणराव धोबे यांची उपस्थिती होती.!
कार्यक्रमाला उपस्थित नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले, खा. बाळू धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर, राजेंद्र वैद्य व मान्यवर, होती. नवनिर्वाचित आमदार म्हणून सुधाकर अडबाले निवडून आल्यानंतर चंद्रपुरात प्रथम आगमनानिमित्त महाविकास आघाडीतर्फे विजययी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळू
धानोरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सीमा अडवाले, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे, डॉ. बबनराव तायवाडे, वितेश खांडेकर, राजेंद्र वैद्य, संदीप गिन्हें रामू तिवारी, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, परशुराम धोटे, प्रा. अनिल शिंदे, प्राचार्य सूर्यकांत खनके, प्राचार्य श्याम धोपटे, राजेंद्र खाडे, राजेश नायडू, दिलीप चौधरी, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, लक्ष्मणराव धोबे यांची उपस्थिती यांनी मानले. प्रास्ताविक श्रीहरी शेंडे यांनी केले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा इतिहास यावेळी विशद केला. सूत्रसंचालन सतीश मेश्राम यांनी केले.