पनवेल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
रायगड :-नवीन पनवेल
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती १९ फेब्रुवारी रोजी शिवश्री रिक्षाचालक मालक संघटना अयप्पा रिक्षा स्टॅन्ड नवीन पनवेल सेक्टर १३ येथील सर्व रिक्षाचालक यांनी शिवजयंतीचा नियोजन केले होते या वेळी मुख्य पाहुणे जयंत पाखरे शिवसेना उप विभाग प्रमुख देवद, विचुंबे,सुकापूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाटील गुरुजींना शाल व श्रीफळ वाढवून सत्कार केला. पेंटर शशिकांत आंग्रे याचा सत्कार ट्रफीक पोलीस सुतार साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित हनुमंत खंडागळे शाखाप्रमुख सुकापूर, सचिन खरात उप शाखाप्रमुख सुकापूर, दिपक दळवी, कदम सुकापूर येथील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.तसेच आयोजन शिवश्री रिक्षाचालक मालक संघटनेचे राजेंद्र गोरे,विवेक अहिरे, शशिकांत आंग्रे, राजू शेलार,शरद देशमुख, कल्पेश बडगुजर, किरण मराठे,विकास गोरे,उत्तम एसनकर,महेंद्र धाबे,सचिन माळी, आनंद जमादार, शंकर भोई, आण्णा देशमुख, हर्षल गोरे,विजय म्हात्रे, पिण्या राठोड, रवि धाबे,जयप्रकाश सिंग,योगेश पाटील, प्रदीप जोईल, सुरेश जमादार, आण्णा महाजन,सचिन पाटील, राजू भोईर, बसु, नंदकुमार घरत,चोणकर मामा, राजेंद्र बडगुजर, सोनावणे या सर्वानी मिळून नियोजन केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे आहे. या दिवशी समाजाच्या सर्व स्तरांतून शिवभक्त शिवरायांना मानवंदना देतात. या दिवशी त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात काहीजण सार्वजनिक मिरवणूक काढतात. गावखेड्या पाडया पासून शहरांत शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.