दारुड्या मामाची १७ वर्षीय भाचीवर वाईट नजर

55

दारुड्या मामाची १७ वर्षीय भाचीवर वाईट नजर

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं 

मो 9096817953

नागपूर : शेजारी राहणाऱ्या दारुड्या मामाची १७ वर्षीय भाचीवर वाईट नजर पडली. त्याने घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत भाचीला घरात ओढून शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी आरोपी मामावर गुन्हा दाखल केला असून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात. तिला लहान बहीण आणि भाऊ आहे. तिच्या शेजारी आरोपी द्वारकेश (३५) नावाचा मामा राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याची भाचीवर वाईट नजर होती. तो तिच्या घरी जाऊन तिचा लाड करण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील चाळे करीत होती. तिने सुरवातीला मामा असल्यामुळे दुर्लक्ष केले. तिचे आईवडील घरी नसताना तो वारंवार घरी यायला लागला. त्याने तिला भेटवस्तू, चिप्स किंवा चॉकलेट देऊन जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले.