महानायक फाऊंडेशन या सामाजिक संस्थे तर्फे विविध योजनाची जनजागृती
गुणवंत कांबळे
मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
महानायक फाऊंडेशन रबाले नवी मुंबई या सामाजिक संस्थे च्या वतीने दिनांक २/३/२३ रोजी भिवंडी तालुक्यातील वडघर – पंचशील नगर, नांदकर सांगे, पारिवली, कबाड (ब) कोलीवली – रमाबाई नगर व दिनांक ३/३/२३ रोजी कल्याण तालुक्यातील गोवेली, खोणी – वडवली, जांभूळ, पिंपरी, भोपर – देसलेपाडा या ग्रामीण भागात महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची पथनाट्याच्या माध्यमातून सकाळी आठ ते रात्री नऊ वाजे पर्यंत जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्थानिक गावकर्यांनी खूप सहकार्य केले असल्याची माहिती महानायक फाऊंडेशन च्या अध्यक्षा छाया दिलीप कांबळे यांनी दिली.
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क संचालनालय मंत्रालय मुंबई अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय ठाणे, यांचे महानायक फाऊंडेशन ला खुप चांगल्या प्रकारे सहकार्य केले असल्याची माहिती महानायक फाऊंडेशन चे सचिव व अभिनेते दिलीप कांबळे यांनी दिली.
शासकीय योजनांची माहिती देण्याकरिता प्रत्येक गावातील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, ग्रामस्थांचा महानायक फाऊंडेशन चे कलाकार, प्रितेश मांजलकर, पुनम मांजलकर, बुध्दभूषण येलवे, लवेश सावंत, सुशांत पवार, शिवानी गमरे, निमिषा नार्वेकर, समृध्दी धोत्रे, संबुध्द मोरे, चाँद सय्यद, कैलास कांबळे