दारूने दोघा मित्रांना केले कायमचे दूर, क्षुल्लक कारणावरून दोघा जणांमध्ये वाद, एकाचा मृत्यू

त्रिशा राऊत

नागपुर ग्रामीण प्रतिनिधी 

मो: ९०९६८१७९६३

नागपुर: होळीच्या पूर्वसंध्येला नागपूर हत्येच्या घटनेने हादरले आहे. बालपणीच्या मित्राने आपल्या दोस्ताची दारूच्या नशेत दगडाने ठेचून हत्या केली. यशोधरा नगरमध्ये ही घटना आज उघडकीस आली.दारू किती वाईट असते याचा प्रत्यय देणारी घटना नागपुरातून समोर आली आहे. दारूने दोघा मित्रांना कायमचे दूर केले. क्षुल्लक कारणावरून दोघा जणांमध्ये वाद झाला. यावेळी एका मित्राने बाजूला पडलेला दगड उचलून दुसऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.राकेश मोतीलाल पटेल (वय ३४ वर्ष, मानवता नगर) असे मृताचे नाव आहे. दुसरीकडे पोलिसांनी आरोपी रोहन उर्फ बंटी रमेश रामटेके (२२, मानवता नगर, टेका) याला अटक केली. दोघेही मद्यपी आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एक वाजण्याच्या सुमारास दोघेही यशोधरानगर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाहेर फूटपाथवर बसून मद्यपान करत होते. यादरम्यान दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, मित्राच्या अंगावर बसून आरोपी मित्र रोहनने त्याच्या बाजुला ठेवलेल्या दगडाने राकेशवर वार करत जखमी केले.खरं तर नेहमी दोघे सोबत आणि जीवाला जीव लावणारे मित्र होते. तेच एकमेकांच्या जीवावर उठले. दारूने घात केला आणि त्यांनी एकमेकांची मैत्री कायमची गमावली.या हल्ल्यात राकेश गंभीर जखमी झाले असून त्याला तात्काळ मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here