गोंदिया गोकुल धाम काँलोनीच्या बिल्डिंग वर चढून अज्ञात इसमानी गळफास लावून केली आत्महत्या
राजेन्द्र मेश्राम
गोंदिया शहर प्रतिनिधी
मो: 9420513193
गोंदिया, गोकुल धाम कालोनीतील एका बिल्डिंग च्या दुसर्या माळ्यावर चढून गळफास लावून आत्महत्या. हा इसम छत्तीसगड चा असून गोकुल धाम काॅलोनीत आला आणि एका घरच्या गेट उघडून बिल्डिंग वर चढला
घरच्या ना अनोळखी इसम कसा काय चढत आहे. न घाबरता बिनधास्त वर चढतानी पाहुन ,त्वरित पोलीस विभागाला सूचना देण्यात आले, पोलीस कॉन्स्टेबल , अग्निशमन विभाग घटना स्थळी दाखल झाले. बातमी पसरताच गोंदियातील सामाजिक कार्यकर्ते यांनी या इसमाला खाली उतर तुला काही ही करणार नाही
पोलिस,सामाजिक कार्यकर्ते खालून बोलत असत हा खाली उतरेल या हेतूने प्रयत्न करित होते . खाली उतर बसू न नास्ता चाहा घेवू.चर्चा करु तु का चढला वर, असा संवाद त्याच्यांंसी चालताना त्याने म्हटले मी घरच्या मडंळी सी बोलेन त्या ला फोनवर घरच्यांसी बोलनी करून दिले तो स्व :हा घरच्या मंडळी सी बोलला , त्या नी पाणी मागीतले , त्या ला पाणी बाटलीला रसी बांधून देण्यात आले.त्याने आपल्या जवळ बाटली, दोरी, तार घेऊन वर चढला होता , तो वरुन च बोले मी फासी लावतो, ,मी खाली येत नाही , मि खाली आलो की, तुम्ही मला मारणार च हिच रट लावत बसला.
4 तास वर चढून होता .खाली पोलीस कर्मचारी, अग्निशमन विभाग कर्मचारी तैनात होते.वर चढून कसा खाली आणावा पोलीस विभागा समोर प्रश्न होता .त्याने वर जाण्याचा मार्ग ही ताराने बंद केला होता .पोलिस वर चढता पाहुन खाली ऊडी मारेन या तयारीत दिसत होता.हा घटना क्रम 4तास चालीत राहिला आणि सेवटी त्याने दुस-या माळ्यावर गळफास लावून आत्महत्या केली.
घरची मंडळी घरुन निघाल्यावर वाटेत च गाडी बिघडली , असी माहीती मिळाली , घरची मडंळी वेळ वर आली असती तर कदाचित वाचवू शकला असता.