माणगांव लोणशी येथे वनवा विझविताना एकाचा मृत्यू

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-माणगांव तालुक्यातील लोणशी या गावातील मयत इसम रुपेश केकाणे हा आपल्या शेतामध्ये लागलेला वनवा विझविण्यासाठी गेला होता. परंतु तो घरी का आला नाही हे बघण्यासाठी फिर्यादी इसम दिनेश महीपत केकाणे हा गेला असता पाण्याच्या ओहला जवळ रुपेश बाळाराम केकाणे हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस सुत्रानुसार सविस्तर वृत्त असे की दि.१७ मार्च रोजी फिर्यादी दिनेश महीपत केकाणे व मयत रुपेश बाळाराम केकाणे वय वर्ष ४० रा. लोणशी हे वनवा विझविण्यासाठी गेले होते परंतु रुपेश केकाणे हा घरी का पोहचला नाही म्हणून रुपेश याचे वडील त्या ठिकाणी गेले असता लागलेल्या वनव्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या ओहला जवळ रुपेश हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. तसेच त्याचा डावा पाय भाजलेला दिसला असता त्यास माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत असे घोषित केले.

या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथें १३/२०२३ सी आर पी सी कलम १७४ प्रमाणे करण्यात आली असून माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास सह पोलीस निरीक्षक आस्वर, सह फो. कदम, पो. सब इन्स्पेक्टर गायकवाड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here