गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे हात से हात जोडो अभियान

अमित कुमार

सालेकसा प्रतिनिधि

मो: 7057793566

दिनांक 23 मार्च 202)रोजी, आरमोरी तालुक्यातील मौजा बोडदा, बोडदाचक, सूर्यनगर, देलोडा खुर्द व देलोडा बुद्रुक येते राबविण्यात आले.

 भाजप सरकारची हुकूमशाही शिघेला पोहोचली असून, गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने हात से हात जोडो अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपुढे भाजप सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा भांडाफोड करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष भूपेश कोलते, तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, श्रीकांत भजभुजे, गुलाब गन्नाटे, माजी सभापती गेडाम साहेब, केवलराव गेडाम, रविभाऊ गन्नाटे, रविभाऊ कावळे, दादाजी गन्नाटे, अरविंदजी खटाले, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here