मुबंई गोवा महामार्गावर कशेने गावच्या हद्दीत कार व टेम्पो चा भीषण अपघात अपघातात दोन नातवासह आजीचा मृत्यू
✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-मुबंई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका दिवसान दिवस वाढत चालली आहे. मुबंई बाजूकडून माणगांव बाजूकडे येणाऱ्या सेंट्रो कार व माणगांव बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात कशेने गावाजवळ झाला असता या अपघातात आजीसह दोन नातवाचा मृत्यू झालं.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की दि.०७ एप्रिल रोजी आयशर टेम्पो क्रमांक जि ए ०३ के ५९९० गोवा येथून मुबंई बाजूकडे निघाला असता माणगांव येथील कशेने गावच्या हद्दीत आला असता मुबंई बाजूकडून माणगांव बाजूकडे येणारी सेंट्रो कार क्रमांक एम. एच ०२ सीडी २६६७ ही भरधाव अतिवेगाने अचानक चुकीच्या दिशेला येऊन आयशर टेम्पोला धडक दिली या अपघातात सेंट्रो कार मध्ये असलेली वैशाली विजय तावडे वय वर्ष ७२,रियान दर्शन तावडे वय वर्ष ०३, रिया दर्शन तावडे वय वर्ष ०६ यांचा जागीच मृत्यू झाला तर दर्शन तावडे व स्वेता तावडे यांना किरकोळ दुखापत झालं असून तावडे कुटुंब मुबंई बोरिवली येथून देवगड येथे चालले असता इंदापूर येथील कशेने गावच्या हद्दीत आला असता हा दुर्दैवी अपघात झालं.
आपल्या निरागस मुलाचा जाण्याने पालकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. तेथील बघणाऱ्या ग्रामस्थांना काळजाचा ठोका चुकावा असाच या अपघाताचा प्रसंग होता. याबाबत माणगांव पोलीस अधिक तपास करीत आहेत.