मुबंई येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला माणगांव पोलिसांनी घेतले ताब्यात…..

✍️सचिन पवार ✍️

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301📞

माणगांव :-मुंबई सांताक्रुज येथे काही दिवसापूर्वी घडलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी आतिष प्रकाश जाधव वय वर्ष २० रा. सांताक्रुज पश्चिम मुबंई हा माणगांव तालुक्यातील खरवली येथे आल्याची गुप्त माहिती माणगांव पोलिसांना मिळताच माणगांव ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर, पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर, पो, शिपाई रामनाथ डोईपोडे पो. शिपाई अमोल पोधे पाटील, पो. शिपाई श्यामसुंदर शिंदे यांनी खरवली येथे जाऊन सापळा रचून आरोपी आतिष प्रकाश जाधव याला ताब्यात घेतले.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की दि.१२ एप्रिल रोजी मुबंई सांताक्रुज पोलीस स्टेशनं येथे गुन्हा रजि नं ३१३/२३ भा.द.वि. कलम ३७६,३१७ पोस्को ४,८,१२ मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अतिश प्रकाश जाधव वय २० रा. ओंकार गल्ली, गजदर बांध सांताक्रुज पश्चिम हा खरवली ता. माणगांव परिसरात आल्याची खबर माणगांव पोलीस ठाण्यात आल्याची खबर मिळताच त्यास माणगांव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला मुबंई सांताक्रुझ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.माणगांव तालुक्यात प्रत्येक घडणाऱ्या गुन्ह्यात माणगांव पोलीस अग्रेसर राहिले आहेत अशा या कामगिरीत माणगांव पोलिसाचे कौतुक सगळीकडे पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here