Home latest News सोयगाव : चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या, पतीसह -सासरकडील आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये...

सोयगाव : चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या, पतीसह -सासरकडील आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल

79

सोयगाव : चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; घरातील औषधीचे अतिसेवनाने विवाहतेचा मृत्यू, पतीसह – सासरकडील आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल

माधवराव कऱ्हाळे 

सोयगाव प्रतिनिधी 

पतीसह सासरकडील मंडळींकडून वारंवार होणाऱ्या शिवीगाळ, मारहाण,शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून सोयगाव येथील विठ्ठल नगर भागात राहणाऱ्या विवाहिता सुरेखा योगेश काळे (वय ३४) हिने बुधवारी (दी.५) घरातील औषधीचे (गोळ्या) अतिसेवन केल्याने तिचा जळगाव येथे रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (दी.१०) मृत्यू झाला. 

याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील प्रकाश कौतीक शिंदे रा. घोसला ता. सोयगाव, हल्ली मुक्काम बिल्लीमोरा,जी नवसारी (गुजरात) यांनी सोयगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव व जामनेर जी जळगाव येथील सासरकडील पतीसह सासू, जेठ,जेठानी व पुतणी यांच्यासह एकूण आठ जणांविरुद्ध भादवीच्या विविध कलमान्वये (दी.११) रोजी पहाटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मयत विवाहिता सुरेखाचे वडील कौतीक शिंदे यांनी सोयगाव पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी सुरेखा हीचा सोयगाव येथील योगेश साहेबराव काळे यांच्यासोबत २००६ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर पती व त्यांच्या कुटुंबीयांनी मुलीला दोन वर्षे चांगले वागविले. दरम्यान जावई योगेश हा औरंगाबाद येथे नर्सिंग होस्टेलला नोकरीला लागल्याने मुलीला घेऊन गेले होते, दरम्यान त्यांनी तेथे आपल्या मुलीला ते चारित्र्याच्या संशयावरून दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करीत होते. दरम्यान तेथे झालेल्या कर्जबाजारी पणामुळे ते नोकरी सोडून सोयगाव आले होते. 

सोयगाव येथेही मुलीचे पती, सासू, जेठ, जेठाणी,पुतणी, आदी जन वारंवार टोमणे मारून कोणत्याही कारणावरून मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देत असत. या होणाऱ्या अत्याचाराची माहिती तिने वारंवार आम्हाला फोन वरून दिली होती.तसेच दोन वेळा आमच्या राहत्या गावी घोसला येथे काकांकडे येऊन सांगितली होती.त्यावेळी गावातील प्रतिष्ठित लोकांनी समजूत काढून नांदावायस पाठवले होते.

या सततच्या शारिरीक व मानसिक जाचास कंटाळून सुरेखा हिने (दी.५) सासरी औषधीचे (गोळ्या) अतिसेवन करून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान सुरेखा हिस पाचोरा व तेथून जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.उपचारादरम्यान सुरेखा हीचा सोमवारी (दी.१०) दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तीच्या मृत्यूस सासरकडील लोक जबाबदार असल्याचे म्हटल्यावरून सोयगाव पोलिसात पती योगेश साहेबराव काळे, सासू इंदूवाई साहेबराव काळे,जेठ चंद्रकांत साहेबराव काळे, जेठाणी प्रतिभा चंद्रकांत काळे,

पूतनी सायली व ईतर तिघांविरुद्ध गु र न.००६७/ २०२३ भारतीय दंड विधान कायदा ३०६,४९८अ,३२३,५०४,५०६ व ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी पुढील तपास सपोनि अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अमोल केडा, जमादार राजू बर्डे रवींद्र तायडे अजय कोळी गणेश रोकडे आदी पुढील तपास करीत आहे.

मच्या मुलीच्या मृत्यूस सासरकडील मंडळी जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी माहेरकडील मंडळींनी मृत विवाहितेचे शव पोलीस स्टेटेशनला आणून पोलीस स्टेशन समोर ठिय्या दिला. यावेळी एकाच खळबळ उडून तणाव निर्माण झाला होता. यावेळी सपोनि अनमोल केदार यांनीतात्काळ पोलीस स्टेशन गाठून माहेरच्या मंडळींची समजूत घातल्याने वातावरण निवळले.