भीमजन्मोत्सवनिमित्त जितेंद्र कांबळे गुरुजी यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान

पूनम पाटगावे

मुंबई प्रतिनिधी

मुंबई :- बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ५२२ सलग्न माता रमाई महिला मंडळ आणि श्रावस्ती बौद्धजन सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १२ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय भीमजयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

या महोत्सवात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घर सजावट स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित केलेल्या महिला मेळाव्या दरम्यान धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी निम्म आयुष्य पूर्ण वेळ धम्मकार्यासाठी स्वतः ला वाहून घेतलेले, महिलांना सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी मार्गदर्शन करणारे, लहानापासून जेष्ठ्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवणारे आदरणीय बौधचार्य आयु. जितेंद्र सखाराम कांबळे यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महामानवाच्या जयंतीनिमित्त हा केलेला गौरव विशेष उल्लेखनीय होता, असे मत कांबळे गुरुजींनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here