पेण तालुक्यात अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या.

सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जामिनावर सुटलेल्या नराधमानेच पुन्हा असे दुष्कृत्य केलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

अलिबाग :-  राज्यात महिला अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एका अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण पेण तालुका हादरला आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जामिनावर सुटलेल्या नराधमानेच पुन्हा असे दुष्कृत्य केलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील मळेघर वाडी इथल्या साबर सोसायटीमधील मोतीराम तलाव इथं आदीवासी वाडीत ही घटना घडली आहे. एका अडीच वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करण्यात आला असून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

खरंतर, राज्यात गुन्हेगारांना कसलाही धाक उरला नाही हेच या घटनेमुळे समोर येत आहे. आरोपी हा आधीच एका बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. पण तरीदेखील त्याला कायद्याची भीती नव्हती. त्याने एका गुन्ह्यानंतर आणखी एक गुन्हा करण्याचं धाडस केलं. राज्यात जर गुन्हेगार अशा प्रकारे मोकाट फिरणार असतील तर पोलिसांचा धाक राहिला आहे का? असाच प्रश्न समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here