हिंगणघाट येथे भीमा कोरेगाव शाैर्य दिन साजरा. वीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली.
प्रशांत जगताप
हिंगणघाट:- विविध सामाजिक संघटना आणी भीम आर्मी हिंगणघाटच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शाैर्य दिन साजरा करण्यात आला. 1 जानेवारी 1818 ला भीमा कोरेगाव येथे समता प्रस्थापीत करण्याकरिता पेशवा विरुद्ध इंग्रज व महार बटालियन जे युद्ध झाले त्या युद्धात शहीद झालेल्या वीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली. आणी या युद्धामुळे महाराष्ट्रातील जुलमी पेशवाई कशी नष्ट केल्या गेली. आणी या उभ्या महाराष्ट्रात एक नविन समतावादाचा पाया रोवला गेल्याची नोंद ईतिहास लिहली गेली. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केल.
याप्रसंगी अश्विन तायवाडे, राजु भगत, रवी कांबळे, आशीष अंबादे, मून साहेब, मिडीया वार्ता न्यूजचे कार्यकारी संपादक प्रशांत जगताप आणी इतर अनेक आंबेडकरी कार्यकर्ते आणी अनुयाई प्रमुख्याने उपस्थित हाेते.