सखी लोकसंचलित साधना केंद्र साखरीटोलाची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अमित सुरेश वैद्य

 सालेकसा तालुका प्रतिनिधि

 मो: 7499237296

आज दि. ३१ जुलै ला रुबी सभागृह साखरीटोला येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) गोंदिया, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतरगत सखी लोकसंचालित साधन केंद्र साखरीटोला ची सहावी वार्शिक सर्वसाधरण सभा अयोजित करन्यात आली होती. सदर सभामधे सखी लोकसंचलित साधन केंद्र साखरीटोला अंतरगत चालत असलेले ग्रामसंस्था, महिला बचत गट, त्यामाधिल ज्या महिलानी , बचत गटानी, ग्रामसंस्था नी एफपीओ, पशुसाखी, सीआरपी, लघु उद्योग, इतर वेगवेगळ्या क्षेत्रत उलेखनिय कामगिरी केली त्याना प्रशस्तीपत्र देउन सन्मानित करन्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मा.संजय सांगेकर (वरिष्ठ समन्वय अधिकारी माविम गोंदिया) यानी महिलाना बचत गटाचे महत्व व फायदे, वेगवेगळ्य योजना, कर्ज योजना त्‍या कर्जाचा योग्‍य वापार आनि परतफेड यावर साविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख उपस्थीत महेश सुरसौत (केंद्र व्‍यवस्‍थापक सीएफएल देवरी ) यानी आर्थिक साक्षरता, बचत व गुंतवणुक, अर्थिक नियोजन, विमा, पेन्शन, सुकन्या समृद्धी योजना इतर योजना वर सविस्तर महिती दिली. सखी लोकसंचलित साधन केंद्र साखरीटोला ची आज पर्यंत वाटचाल, राबवन्यात आलेले विविध उपक्रम, ग्रामीण भागात केलेले महिला शक्षमीकरनाचे कार्या करण्यत आले यावर अधारित *यशस्वी* या पुस्तकाचे मान्यवरांच्‍या हस्ते विमोचन करण्‍यात आले.

उपस्थीत मा.भूषण कोरे (उपजीविका सल्लगार सालेकसा )यानी वेगवेगळ्या उद्योग व योजना यावर मार्गदर्शन केले, सीएमआरसी सचिव गीताताई पडोळे यानी सखी लोकसंचलित साधन केंद्र चे वार्शिक इतिवृत्त वाचन करुण संगितले.या कार्यक्रमाला CMRC अध्यक्ष विद्याताई पारधी, उपाध्यक्ष हरिंद्र बडोले, वन धन अध्‍यक्ष पुस्‍तकला टेकाम, CMRC व्‍यवस्‍थापक रोशनी गायकवाड, सरपंच ग्रा.प. तिरखेडी प्रिया शरणागत, ग्रा.प.साखरीटोला उपसरपंच अफरोज पठाण, मंजुषा दोनोडे, निशा शिवणकर, संगिता शहारे, ललिता पाथोडे, ग्रा.प. सदास्य सुनीता चकोले, ग्रा.प. सदस्या श्वेता अग्रवाल, इंदुताई कोरे, CMRC लेखापाल उमेश ठाकरे, सीएफएल तालुका समन्वयक राजेंद्र भोयर, उपस्थीत होते. व सर्व ग्रामसंस्था चे लेखपाल, CRP, बचत गटातिल महिला उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीएमआरसी सहयोगिनी उषा पटले यानी केले. तर आभार CMRC सहयोगिनी नैनाताई कटरे यानी केले. व सर्व महिला, CRP, लेखापाल, सहयोगिनी यांच्‍या सहयोगातून कार्यक्रम यशस्वी झाले।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here