Home latest News प्राचार्य मदन धनकर यांच्या निधनाने चंद्रपूरच्या साहित्यिक, सांस्कृतिक वैभवाची हाणी : आमदार...

प्राचार्य मदन धनकर यांच्या निधनाने चंद्रपूरच्या साहित्यिक, सांस्कृतिक वैभवाची हाणी : आमदार सुभाष धोटे

75

प्राचार्य मदन धनकर यांच्या निधनाने चंद्रपूरच्या साहित्यिक, सांस्कृतिक वैभवाची हाणी : आमदार सुभाष धोटे

शुध्दोधन निरंजने

राजूरा तालूका प्रतिनिधी

मो: 9921115235

राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्य़ातील साहित्य पंढरीचे वारकरी, ज्येष्ठ साहित्यिक, सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांच्या निधनाची बातमी मन अस्वस्थ करणारी असून त्यांच्या निधनाने चंद्रपूरच्या साहित्यिक, सांस्कृतिक वैभवाची फार मोठी हाणी झाली आहे. प्राचार्य धनकर यांचे केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान होते. त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातूनही आपला ठसा जनसामान्यांवर उमठविला होता.

प्राचार्य धनकर यांनी ओजस्वी वाणी आणि कर्तृत्वातून आयुष्यभर अनेक माणसं जोडली. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली. त्यांच्या निधनाने जिल्ह्य़ातील जनता एका अष्टपैलू व्यक्तीमत्वाला मुकली आहे अशा शब्दांत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या संवेदना शोकसंदेशातून व्यक्त केल्या आहेत.