अक्कलकुवा पंचायत समितीच्या गैरहजर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा – ॲड.रुपसिंग वसावे यांची मागणी

nandurbar-district-news-update

प्रकाश नाईक
नंदुरबार ब्युरो चीफ
मो.📱 9511655877

नंदुरबार :- दि. 11 सप्टेंबर अक्कलकुवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन मेलद्वारे पाठविण्यात आले. निवेदनात नमुद केले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पंचायत समितीचे कार्यभार वाऱ्यावर असुन अक्कलकुवा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा आणि जिल्हा परिषद, नंदुरबार यांचा अक्कलकुवा येथील पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे अनेकदा समोर आले आहेत.

अमेझॉनवर खास ऑफर, मीडिया वार्ताच्या वाचकांसाठी
स्मार्टफोन, टीव्ही, घरगुती उपकरणे यांवर तब्बल ५०% सूट. लाभ घेण्यासाठी खालील बॅनरवर क्लिक करा.

अक्कलकुवा तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे व या तालुक्याचे कार्यक्षेत्र हे दुर्गम भागातील असल्याने ग्रामीण भागातील येणाऱ्या नागरिकांना अनेकदा अधिकारी-कर्मचारी संबंधित विभागांत भेटत नाहीत व भेटले तर पैशाशिवाय कामे करीत नसल्याचे गंभीर स्वरूपाचा तक्रारी दुर्गम भागातील नागरिकांच्या आहेत व या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालयाच्या नियोजित वेळेपूर्वीच काही कर्मचारी व अधिकारी निघून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्मचारी आपापल्या टेबलावर काम करताना दिसून येत नसल्याने येथील तालुक्यातील जनतेचे कामे कार्यालयीन वेळेवर होत नाही. त्यामुळे शासकीय कार्यालयातील अशा दांडी बहादर व कामचुकार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीकडे आल्या आहे.

“त्या पार्श्वभूमीवर मी यांनी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कामानिमित्त, पंचायत समिती अक्कलकुवा येथे सामान्य प्रशासन विभागाचे अरविंद अहिरे सहा.प्रशासन अधिकारी यांची भेट घेण्याकरिता कार्यालयात गेलो असता ते आपल्या टेबलावर आढळून आले नव्हते. त्यामुळे या दांडी बहाद्दरावर कारवाई करण्यात यावी व या गैरहजर कर्मचाऱ्यांमध्ये काही विभागप्रमुख देखील आहे, मात्र हे विभागप्रमुख कार्यालयीन बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले होते” –  ॲड. रुपसिंग वसावे

या गैरहजर कर्मचाऱ्यांवर पुढील कारवाई करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांकडून तात्काळ अहवाल मागविण्यात यावा. तथापि विभागातील कर्मचाऱ्यांना कारवाईपासून वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याची दाट शक्यता नाकारता येत व सदर प्रकरणावर सारवासारव होण्याची शक्यता देखील अधिक आहे. याबाबत दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यावर कडक प्रशासन करण्याची गरज आवश्यकता आहे. या निवेदनाच्या माध्यमातून अक्कलकुवा तालुक्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावणेकरिता व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याकरिता जिल्हा परिषद नंदुरबार यांच्यामार्फत कडक कार्यवाही व्हावी यासाठी आपल्या स्तरावरून समिती गठीत करुन अरविंद अहिरे सहा. प्रशासन अधिकारी यांच्यासह इतर दांडीबहादूर कर्मचारी यांच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अक्कलकुवा – धडगाव विधानसभा अध्यक्ष – ॲड. रुपसिंग वसावे यांनी केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here