अच्छे दिन आले का?श्री महेश केदारी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख यांनी होऊ द्या चर्चा मोहीम अंतर्गत जुमलेबाज सरकारची केली भांडाफोड.
मारोती काबंऴे
मीडिया वार्ता न्यूज
गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मों नं.9405720593
तालुका अहेरी:7 ऑक्टोबर 2023 रोजी अहेरी येथील प्रभाग क्रमांक 05 रमेश वेलादी यांच्या घरासमोरील चौकात श्री महेश जी केदारी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली होऊ द्या चर्चा करूया बोलघेवड्या शासनाचा भांडाफोड आयोजित करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक जिल्हा प्रमुख श्री रियाज शेख तसेच प्रमुख अतिथी श्री प्रफुल्ल एरणे तालुकाप्रमुख ,अहेरी ग्रामीण तालुकाप्रमुख सुनील वासनिक, सदस्य नगरपंचायत अहेरी विलासभाऊ सिडाम, सौ तुळजाताई तलांडे युती सेना जिल्हा अधिकारी सौ चंदनाताई बिश्नोई उपजिल्हा संघटिका सपना ताई ईश्वरकर तालुका संघटिका नखिर शेख शहर प्रमुख आयान पठाण युवा सेना शहर अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी श्री महेश जी केदारी यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्र शासन व राज्य शासन ला धारेवर धरले. *उपस्थित जनतेला अच्छे दिन आले का असा प्रश्न सभेत उपस्थित केले असता जनतेनी तीव्र निषेध करीत वाईट दिवस आल्याचे रोष व्यक्त केले*.श्री महेश केदारी समोर आपल्या भाषणात म्हणाले अहेरी विधानसभा क्षेत्रात रस्त्याचे फार गंभीर समस्या असून पाचही तालुक्यातील रस्ते खड्डेमय झालेले आहे आलापल्ली शिरोंचा महामार्ग मागील पाच-सहा वर्षांपासून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी गंभीर परिस्थिती असतानाही केंद्र सरकार व राज्य सरकार सत्तेचा *माज* करीत केवळ कागदावर घोषणाबाजी करीत आहे एकही योजनाच्या गोरगरीब जनतेला लाभ मिळत नाही देशात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, व्यापारी, मध्यमवर्गीय कर्मचारी, सर्वसामान्य जनता केंद्र व राज्य शासनाच्या धोरणापासून त्रस्त झालेली आहे *दिवसेंदिवस देश हुकूमशाहीकडे वळून राहिला लोकशाहीसाठी घातक असल्याने देशातील व राज्यातील जनतेला एक होऊन भाजपा सरकारला हद्दपार करणे अत्यंत आवश्यक आहे* संविधानाच्या रक्षण करणे देशातील सर्व नागरिकांच्या कर्तव्य आहे गडचिरोली जिल्ह्यात खनिज संपत्ती वनसंपत्ती असतानाही या जिल्ह्याच्या विकास न होण्याच्या कारण केवळ येथील लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याच्या तीव्र रोष व्यक्त करीत श्री महेश केदारी यांनी गंभीर आरोप यावेळी व्यक्त केले तसेच श्री रियाज शेख जिल्हाप्रमुख यांनी केंद्र शासन व राज्य शासनावर आरोप करीत सांगितले की शासन आपल्या दारी हा उपक्रम केवळ निवडणुकीच्या तयारीसाठी प्रचार व प्रसार करीत आहे करीत आहे जनतेशी काही घेणेदेणे नाही सध्याच्या परिस्थितीत केंद्र शासन व राज्य शासनावर जनता तीव्र नाराजी व्यक्त करीत असल्याच्या चित्र दिसल्याने मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद महानगरपालिका निवडणुका समोर ढकलण्यात येत आहे महायुती सरकारला माहित आहे निवडणुकी घेतल्यास *भुईसपाट* होणार म्हणून घाबरलेली त्रिमूर्ती सरकार निवडणुकी घेत नाही व निवडणुका जाहीर करणार नाही असे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी *रोखठोक* आपल्या भाषणात सांगितले. प्रास्ताविक भाषण श्री प्रफुल एरणे तालुकाप्रमुख यांनी केले. होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे शेवटी मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून शोभाताई कुंबरे दिनेश रंगुलवार अक्षय कुडुमते आरिफ शेख आलम अन्सारी अक्षय औतकर बापू ठाकरे गणेश गुरूनुले शोभाताई गुरूनुले असे असंख्य महिला व पुरुषांनी श्री महेश जी केदारी यांच्या शुभहस्ते शिवसेनेच्या भगवा दुपट्टा टाकून पक्षप्रवेश घेण्यात आला अहेरी विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सतत *इनकमिंग* सुरू असल्याचे चित्र दिसत आहे हे विशेष.