श्रीवर्धन मतदार संघातील ठाकरे शिवसेना गटाची पदाधिकारी निवड जाहीर.

श्रीवर्धन मतदार संघातील ठाकरे शिवसेना गटाची पदाधिकारी निवड जाहीर.

श्रीवर्धन मतदार संघातील ठाकरे शिवसेना गटाची पदाधिकारी निवड जाहीर.

श्रीवर्धन मतदार संघातील ठाकरे शिवसेना गटाची पदाधिकारी निवड जाहीर.

✍️ नंदकुमार चांदोरकर✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048📞

माणगाव:आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९३ श्रीवर्धन मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरेगटाचे पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली असून विधानसभा लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायतच्या निवडणुका यांचा विचार करता आपल्या पक्षाने केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपली पक्षाची बाजू मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पदाधिकाऱ्यां वर निवड करून जबाबदारी दिलीआहे. त्यामुळे होऊ घातलेल्या ५ नोव्हेंबर २०२३ मधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत आपलेवर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कामाला लागा असे या पदाधिकारींना सुचितकेले आहे.त्यामुळे पदाधिकाऱ्यांना जोमाने काम करावे लागणार आहे. श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी शिंदे गट भाजप ही एकच आघाडी असल्यामुळे ठाकरे गटाला आपली देखील ताकद दाखवणे जास्त गरजेचं पडत आहे.

त्यामुळे सर्व शक्तीनिशी ठाकरे गट सज्ज झाला आहे तळा तालुक्यातील पूर्वीच्या ग्रामपंचायत या बहुतांश राष्ट्रवादीच्या होत्या तर काही सेनेच्या होत्या व एकच ग्रामपंचायत ही भाजपकडे होती.सद्यस्थितीत तालुक्यात ६ ग्रामपंचायतचे निवडणुकीचे असल्यामुळे भानंग,मांदाड, निगुडशेत,चरईखुर्द,गिरणे,तळेगांव अशा सहा ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.तळा तालुका प्रमुखनाना दळवी हे कट्टर शिवसैनिक ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते असून मोठी जबाबदारी आहे.या मतदार संघातील काही पदाधिकारी कायम आहेत तर काही नव्याने नियुक्त्या झाल्या आहेत.