Home latest News बोरिवली पोलीस निरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या

बोरिवली पोलीस निरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या

96

बोरिवली पोलीस निरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या

राजेंद्र बिल्ला प्रतिनिधी

बोरिवली:- पोलीस वसाहतीत राहणाऱया पोलीस निरीक्षकाच्या मुलाने आज गळफास लावून आत्महत्या केली. मनीष आनंद बागडी असे त्याचे नाव असून घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

खेरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद बागडी हे पत्नी आणि दोन मुलांसोबत बोरिवली पोलीस वसाहतीत राहतात. आज सकाळी आनंद हे बाहेर गेले होते. तेव्हा मनीषने बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आनंद हे घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आला.

मनीषला रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घडल्या प्रकाराची माहिती समजताच बोरिवली पोलीस घटनास्थळी गेले असता तेथे पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. मनीषचे गोराईमध्ये हॉटेल असून त्याने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे स्पष्ट झाले नाही. घडल्या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली.