गर्भवती महिलेवर पाच जणांकडून वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार, कोल्हापुरात धक्कादायक प्रकार उघड.

हिरामण गोरेगांवकर

कोल्हापूर :- आसाम मधील एका गर्भवती महिलेचं अपहरण करुन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आसाम , राजस्थानसह कोल्हापुरात हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कोल्हापूरच्या करवीर पोलीस ठाण्यात चार संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला असून या मध्ये दोन महिलानाचा देखील समावेश आहे. राम करणं योगी आणि दिलीप योगी अशी संशयितांची नाव असून यात परप्रांतीय महिलांचाही सहभाग आहे. पीडित महिला ही आसाम मधील असून तिला एक मुलगी देखील आहे. आणि आता ती गर्भवती आहे अशावेळी सप्टेंबर 2020 मध्ये संशयितांनी तिला आसाम मधील ओळखीच्या ठिकाणी बोलावून घेतले व गुंगीचे औषध दिले. पीडित महिला बेशुद्ध झाल्यांनतर संशयितांनी तिला आसाम मधील एका ठिकाणी नेले. त्या ठिकाणी तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी दिली . शिवाय संशयित रामकरणं याने लग्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडित महिलेला राजस्थान मध्ये आणून काही दिवस ठेवण्यात आले. नंतर सर्व संशयित पीडित महिलेला घेऊन काही महिन्यापूर्वी कोल्हापुरात आले. कोल्हापुरात एका भाड्याच्या खोलीत पीडित महिलेला कोंबून ठेवण्यात आले. दरम्यान पीडित महिला गर्भवती आसल्याचे माहीत असूनसुद्धा संशयित रामकरन योगी आणि दिलीप योगी पीडितेवर अत्याचार केला. संबंधित महिला विरोध केला असता , आम्ही तुला विकत घेतले आहे असे सांगत पीडित महिलेला मारहाण करत असत या दोघांसह अन्य तिघांनी पीडित महिलेवर अत्याचार केले शेजारच्या महिलेच्या मदतीने पीडितेने करवीर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंद केली. त्यानुसार चार संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here