सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते कबड्डीच्या विजेत्यांबक्षिस वितरण.
राजुरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे आयोजित कब्बडी सामन्यांतील विजयी संघांना बक्षीस वितरण कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. अत्यंत चुरशीच्या लढती या कबड्डी स्पर्धेत गुरुदेव क्रिडा मंडळ खांबाडा यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, क्रिडा मंडळ गोवरी यांना दुसरा क्रमांक मिळाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे, ग्राम पंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे, जेष्ठ नागरिक सुधाकर पिंपळशेळे, मारोती साळवे, प्रभाकर साळवे, मारोती मुसळे, सुरेश गौरकार, मंगेश ताजणे, योगराज वाढरे, अमोल निमकर, प्रशांत ताजणे, अनिल बोढाले, विकास बल्की, मनोहर कावळे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.