आम. जोरगेवार यांनी माता महाकालीची मुर्ती देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे चंद्रपूरात स्वागत • आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

64
आम. जोरगेवार यांनी माता महाकालीची मुर्ती देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे चंद्रपूरात स्वागत • आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

आम. जोरगेवार यांनी माता महाकालीची मुर्ती देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे चंद्रपूरात स्वागत

• आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

आम. जोरगेवार यांनी माता महाकालीची मुर्ती देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे चंद्रपूरात स्वागत • आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 27 डिसेंबर
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज चंद्रपूर दौ-यावर असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी वन अकादमी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे माता महाकालीची मुर्ती देत चंद्रपूरात स्वागत केले यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त माजी नगर सेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजित शहा,  तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार आदींची उपस्थिती होती.
आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे चंद्रपूरात आगमन झाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मोरवा विमानतळ येथे पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. नंतर वन अकादमी येथे माता महाकाली महोत्सव समीती आणि यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकालीची मुर्ती देत स्वागत केले.