सौ.दीपिका दीपक भांडारकर यांची शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी रायगड जिल्हा महिकाध्यक्ष पदी नियुक्ती

65

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

रसायनी;कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री.नरेश जोशी साहेब सह मावळ लोकसभा निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौ.माधवी ताई नरेश जोशी.यांचे कार्य उल्लेखनीय आहे.आज समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहचून त्यांचा विकास साधणे.वंचित ,दुर्बल ,गोरगरीब जनतेला न्यायहक्क मिळूवून देणे,या विशेष कामगिरीतून जनतेचा विश्वास मिळवत आपली प्रतिष्ठा निर्माण करणारे एकमेव प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजे माधवी ताई जोशी आणि श्री .नरेश जोशी साहेब .आज ताई आणि दादांच्या कार्याला प्रेरित होऊन असंख्य जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.अनेक नेते कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन शरदंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.त्यांच्या प्रसिद्ध कार्यामुळे पक्ष बांधणीला अधिकच यश मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर माधवी ताई जोशी आणि नरेश जोशी यांच्या उपस्थितीत मू.चंभारली तालुका खालापूर येथील पक्षसंघटना कार्याबद्दल वेळोवेळी आत्मियता दाखवणाऱ्या भगिनी सौ.दीपिका दीपक भांडारकर यांची रायगड जिल्हा महिला अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश दादा टोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री नरेश जोशी यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ लोकसभा निरीक्षक सौ .माधवी ताई नरेश जोशी यांच्या हस्ते सौ .दीपिका दीपक भांडारकर यांनी नियुक्ती पत्रक देण्यात आले.
यावेळी दीपिका ताईंनी मी यापुढे पक्ष संघटनेकरिता नक्कीच विशेष प्रयत्न करेन असा दृढ विश्वास दिला .बहुसंख्येने सौ. दीपिका दीपक भांडारकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या