वाडा (पालघर) मधील नामांकित जेसिंथ इंजिनीअरिंग प्रा. ली. कंपनीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची स्थापना…

56

उल्हास पुराडकर, पनवेल विभाग प्रतिनिधी
७०२८०९८६४२

पनवेल :-आज वाडा (पालघर) मधील जेसिंथ इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीतील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारले. तसेच कामगारांची व व्यवस्थापनेची भेट घेवून कामगारांच्या समस्या व पुढील नियोजना बाबत चर्चा केली. गेल्या ८ वर्षापासुन कामगारांना कामगार कायद्यापासुन वंचित ठेवले होते.

सन्माननीय राजसाहेब ठाकरे व सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अविनाश जाधव (दादा), अध्यक्ष मनोज चव्हाण साहेब, सरचिटणीस संतोष धुरी साहेब आणि कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे साहेब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेवर विश्वास ठेवलेल्या सभासद कामगारांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे सदैव उभी आहे असे आश्वासन दिले.
यावेळी वाडा तालुका अध्यक्ष क्रांतीकुमार ठाकरे, विक्रांत ठाकरे, अनुप राणा, सुरज पवार आणि प्रकाश रिंगे उपस्थित होते.