ग्रामपंचायत कार्यालय मांडेसर येथील मा. सतिश गित्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सम्मानित मान्यवरांकडून पुरस्कार स्वीकारताना सतिश गीत्ते व पत्नी भाग्यश्री गित्ते, मुलगी अदिती गित्ते, श्रृती गित्ते

90
ग्रामपंचायत कार्यालय मांडेसर येथील मा. सतिश गित्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सम्मानित मान्यवरांकडून पुरस्कार स्वीकारताना सतिश गीत्ते व पत्नी भाग्यश्री गित्ते, मुलगी अदिती गित्ते, श्रृती गित्ते

ग्रामपंचायत कार्यालय मांडेसर येथील मा. सतिश गित्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सम्मानित

मान्यवरांकडून पुरस्कार स्वीकारताना सतिश गीत्ते व पत्नी भाग्यश्री गित्ते, मुलगी अदिती गित्ते, श्रृती गित्ते

ग्रामपंचायत कार्यालय मांडेसर येथील मा. सतिश गित्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सम्मानित मान्यवरांकडून पुरस्कार स्वीकारताना सतिश गीत्ते व पत्नी भाग्यश्री गित्ते, मुलगी अदिती गित्ते, श्रृती गित्ते

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मोहाडी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामसेवक मा. सतिश गित्ते ग्राम पंचायत कार्यालय मांडेसर यांचा ग्रामविकासाच्या योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाने आदर्श पुरस्कार बहार करून प्रोत्साहन दिले. उत्कृष्ट ग्रामविकास आणि ग्रामसेवक कार्य केल्याबद्दल आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने मा.श्री. जिभकाटे साहेब अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा , मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कुर्तकोटी शाहेब यांच्या हस्ते ग्रामसेवक मा. सतिश गित्ते यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सम्मानित करून गौरविण्यात आले.

ग्रामीण विकासातील मुख्य भाग म्हणून ग्रामसेवक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ग्रामीण विकासाच्या पहिला आणि शेवटच्या कणा हा ग्रामसेवकच आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने ग्रामसेवक ग्राम विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी हेमंत सेलिब्रेशन हॉल भंडारा येथे पार पडला.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा भंडारा व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ , महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक असोसिएशन जिल्हा शाखा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा हेमंत सेलिब्रेशन हॉल येथे संपन्न झाला. यात भंडारा जिल्ह्यातील ५६ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे खास.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरराव जिभकाटे , उपाध्यक्ष संदीप ताले, मुख्य कार्यपालन अधिकारी समीर कुर्तकोटी, उपमुख्य कार्यपालन अधिकारी उमेश नंदागवळी , जयप्रकाश परब, जिल्हा परिषद सभापती स्वाती वाघाये , सभापती देवाराम रामटेके , कमलाकर रनदिवे , शि. सभापती रमेश पारधी , सभापती राजेश सेलोकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक बोंदरे व जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांचे परिवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.