कळमना येथे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढईंच्या हस्ते स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन.

राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235
राजुरा :- राजुरा तालुक्यातील मौजा कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या पाठपुराव्यामुळे कळमना येथे स्थानिक प्रेरणा ग्राम संघ यांना स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळाला असून या स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आपण सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे ग्राम संघाला स्वस्त धान्य दुकान मिळाले यामुळे आपण समाधानी आहोत. यामुळे निश्चितच महिला सबलीकरण वाढण्यास मदत होईल, महिलाची आर्थिक स्थिती मजबूत होईल, गावातील नागरिकांनाही उत्तम सुविधा व व्यवस्था होईल.
या प्रसंगी सह उद्घाटक उमक मॅडम, उमेद व्यवस्थापिका पं. स. राजुरा, विशेष अतिथी ग्रा. पं. सदस्य सुनिता उमाटे, रंजना पिंगे, महादेव ताजणे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, बुरांडे उमेद पं. स. राजुरा, श्रावण गेडाम, प्रेरणा ग्रामसंघ अध्यक्ष मिना भोयर, सचिव मनिषा धनकड, कार्याध्यक्ष वैशाली आस्वले ह्या होत्या. तसेच उमेद च्या बचट गटातील महिला सुचिता धांडे, सपना मेश्राम, स्नेहा आस्वले , नानेबाई वसाके, जेष्ठ नागरिक देवाजी चाफले, रामदास वाढरे, दत्तुजी कुकडे , जेष्ठ महिला मिराबाई वाढई, गंगुबाई उमाटे, लीलाबाई उमाटे, सुंदराबाई भोयर, लता क्षिरसागर, कल्पना क्षिरसागर शांताबाई उमाटे यासह समस्त प्रेरणा ग्रामसंघाच्या महीला व गावकरी उपस्थित होते.









