अनुसूचित जाती विभागातर्फे जस्टिस फॉर सुमेश

अनुसूचित जाती विभागातर्फे जस्टिस फॉर सुमेश

अनुसूचित जाती विभागातर्फे जस्टिस फॉर सुमेश

अनुसूचित जाती विभागातर्फे जस्टिस फॉर सुमेश
🖋️साहिल सैय्यद
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197

घुग्घुस :- काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे उत्तर प्रदेश येथील घटनेचा निषेध करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश येथे रामपूरच्या सिलाइबारा गावात एका पार्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फलक लावण्यात आल्याच्या कारणावरून १७ वर्षीय युवक सुमेशची पोलिसांनी गोळी मारून हत्या केली.

सुमेश दहावीची परीक्षा देऊन घराकडे जात असतांना पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. सुमेशच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी कृणाल रामटेके शहराध्यक्ष अनुसूचित जाती विभाग चंद्रपुर, अनुश्री दहेगांवकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव अनुसूचित जाती विभाग, घुग्घुस तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा अनुसूचित जाती विभाग चंद्रपुर, नंदकिशोर खोब्रागडे शहर उपाध्यक्ष, रोहित भसारकर शहर उपाध्यक्ष, महेश तावाडे, विमल वर्मा, रेखा बारसागडे, वंदना वाघमारे, संमुदरा बोरकर, सुवर्णा खोब्रागडे, छाया शेंडे आदी उपस्थित होते.