स्त्री शक्तीच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा- ब्रिजभूषण पाझारे नकोडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

स्त्री शक्तीच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा- ब्रिजभूषण पाझारे

नकोडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

स्त्री शक्तीच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा- ब्रिजभूषण पाझारे नकोडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम
🖋️साहिल सैय्यद
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲9307948197

घुग्घुस : येथून जवळच असलेल्या नकोडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ८ मार्च रोजी करण्यात आले होते.

कार्यक्रमात गावातील बचत गटाच्या महिलांनी विविध कला, नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.

याप्रसंगी बोलतांना चंद्रपूर निराधार समितीचे अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे म्हणाले, आधुनिक जगातील महिला शक्ती चूल व मुल सांभाळून स्व:ताच्या अंगी असलेल्या कला गुणांच्या आविष्कारांनी जगात नाव उंचावतात अश्या स्त्री शक्तीला व तिच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा तसेच महिलांना “जागतिक महिला दिवसाच्या” शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन नकोडा ग्रामपंचायतच्या पटांगणात करण्यात आले होते.

यावेळी तनुश्री बांदुरकर माजी सरपंच, साविता कोवे माजी पं. स. सदस्य, संगीता ढेंगळे क्षेत्रीय समन्वय संयोगिनी, शारदा हुसे, सुनिता गानफाडे अध्यक्ष सीएमआरसी, कविता खोब्रागडे, सुजाता गिद्दे, रंजिता काकडे, शीला ढाक, वर्षा झाडे, किरण बांदुरकर सरपंच नकोडा, मंगेश राजगडकर उपसरपंच नकोडा, राजेंद्र भानोसे ग्रामविकास अधिकारी नकोडा, ऋषी कोवे माजी सरपंच, प्रणय कांबळे पोलीस पाटील नकोडा व समस्त नकोडा गावातील महिला बचत गटातील महिलांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here