वादातून शस्त्राने सपासप वार करून तरुणाची केली हत्या, भंडारा टाकळी शहरातील घटना

वादातून शस्त्राने सपासप वार करून तरुणाची केली हत्या, भंडारा टाकळी शहरातील घटना

वादातून शस्त्राने सपासप वार करून तरुणाची केली हत्या, भंडारा टाकळी शहरातील घटना

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा शहरालगत असलेल्या टाकळी येथे वादातून दोघांनी एका तरुणावर चाकुने सपासप वार केले. यात तरूण जागीच गतप्राण झाला. कपील अशोक उजवणे वय ३१ वर्षे ( रा. भगतसिंग वॉर्ड टाकळी ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना दिनांक ११ मार्च २०२४ सोमवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शहराला लागून असलेल्या टाकळी येथे घडली. तरी मंगळवारला सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हत्येनंतर कपीलचा मृतदेह लपविण्यासाठी नालीत फेकून त्यावर दुचाकी ठेवण्यात आली. ऋषभ संजय दोनोडे वय २० वर्षे आणि करण दिलीप भेदे वय २० वर्षे दोन्ही रा. भगतसिंग वॉर्ड टाकळी अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. मंगळवार सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच ताफा घटनास्थळी दाखल झाला.
पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. पोलिसांनी ऋषभ दोनोडे आणि करण दिलीप भेदे यांच्यावर भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी करीत आहेत.

*अशी केली कपीलची हत्या*

प्राप्त माहितीनुसार, कपील व ऋषभ आणि करण यांच्यात सोमवारच्या रात्री टाकळी येथे वाद झाला. भांडण विकोपाला गेले. यातूनच ऋषभ आणि करण यांनी कपीलला टाकळी येथील निर्वाण मेटल कंपनीच्या मागील बाजुच्या मैदानात नेले. तिथे चाकूने कपीलच्या छातीवर, चेहऱ्यावर अनेक वार करुन जिवानीशी ठार मारले. या दोघा मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कपीलचा मृतदेह उचलून मेटल कंपनीच्या मागे असलेल्या सिमेंटच्या नालीत नेऊन फेकला. त्यानंतर मृतदेहावर दुचाकी ठेवून ते पसार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here