आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या दातृत्वाने झाले तेली समाज सभागृह बांधकामाचे भूमीपूजन आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी तेली समाज सभागृह बांधकामासाठी २१ लाख रुपये किमतीची जमीन केली दान

आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या दातृत्वाने झाले तेली समाज सभागृह बांधकामाचे भूमीपूजन आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी तेली समाज सभागृह बांधकामासाठी २१ लाख रुपये किमतीची जमीन केली दान

आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या दातृत्वाने झाले तेली समाज सभागृह बांधकामाचे भूमीपूजन

आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी तेली समाज सभागृह बांधकामासाठी २१ लाख रुपये किमतीची जमीन केली दान

आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या दातृत्वाने झाले तेली समाज सभागृह बांधकामाचे भूमीपूजन आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी तेली समाज सभागृह बांधकामासाठी २१ लाख रुपये किमतीची जमीन केली दान

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : ( मोहाडी ) भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे दानशील आमदार मा. राजूभाऊ कारेमोरे यांनी मोहाडी येथे तेली समाज मंडळाच्या सभागृह बांधकामासाठी स्वःता खरेदी केलेली २१ लाख रुपये किमतीची जमीन दान केली.
दिनांक १३ मार्च २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता तेली समाज सभागृह बांधकामाचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाले.

मोहाडी येथे खासदार मा.श्री सुनिलजी मेंढे यांचे प्रयत्नातून तेली समाज सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्यात आलेले होते. पण तेली समाजाकडे सभागृह बांधकाम करण्याकरीता जागा उपलब्ध नसल्यामुळे सभागृहाचे बांधकाम रखडलेले होते. तेली समाज मंडळ मोहाडीचे पदाधिकारी यांनी जागेचा प्रश्न सोडविण्याकरीता आमदार मा. श्री.राजूभाऊ कारेमोरे यांची भेट घेतली. आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी तेली समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. दिलेले आश्वासन पाळलेच पाहिजे असे ठरवून मोहाडी येथील साई नगरी येथील खाजगी ले-आऊट मधील जागेचा शोध घेण्यात आला. तेली समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तेली समाज सभागृहाचे बांधकाम करण्याकरीता त्या जागेला होकार दिला. खाजगी ले-आऊट मधील अंदाजे २१ लक्ष रूपये किंमतीचे प्लॉट ले-आऊट मालका कडून खरेदी करून, तेली समाज मंडळ मोहाडी यांना सभागृहाचे बांधकाम करण्याकरीता आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी खरेदी केलेली जमीन दान करून दिली.

दिनांक १३ मार्च २०२४ रोज बुधवारला दुपारी १२.०० वाजता साई नगरी मोहाडी येथे तेली समाज मंडळाच्या सभागृहाचे भूमीपूजन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.श्री.सुनिलजी मेंढे यांचे हस्ते आदरणीय श्री.माणिकरावजी कारेमोरे यांचे प्रमुख मार्गदर्शनात, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुभाषभाऊ गायधने, सभापती रितेश वासनिक, माजी नगराध्यश्व तुमसर गिता कोंडेवार, मोहाडीच्या नगराध्यक्षा छाया डेकाटे, कल्याणी भूरे, नगरसेविका मनिषा गायधने, अश्विनी डेकाटे, नगरसेवक पवन चव्हान, सुभाष भाजीपाले, मंगेश पारधी, पत्रकार यशवंत थोटे, नरेंद्र निमकर, हर्षल गायधने, आकाश गायधने, शोभाताई लांजेवार, प्राची पटले, सपना बुरडे, सोनू तरारे, रिता भाजीपाले, विना मारबते, यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाला तेली समाज मंडळाचे अध्यक्ष गजानन गायधने, उमाशंकर बारई, महादेव मोटघरे,गिरीधर मोटघरे, रविकांत देशमुख, विठ्ठल बारई, बाळूभाऊ बारई, रागीणी सेलोकर, राजश्री न्यायखोर, प्रतिभा राखडे, हेमंत मोटघरे, पवन गायधने, प्रभाकर उपरकर, मदन चिंधालोरे, सुनिल देशमुख, विशाल पारधी, संतोष कुंभरे, मनोहर हेडावू, युवराज अवचट, युवराज बारई, महेश गिरीपुंजे, आशिष गायधने आदर्श बडवाईक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यावेळी सर्व तेली समाज बांधवानी आमदार साहेब आणि खासदार साहेब यांचे आभार मानले.