Home latest News प्राध्यापकाकडून सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग भंडारा जिल्ह्यातील बीएड शासकीय महाविद्यालयातील धक्कादायक...

प्राध्यापकाकडून सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग भंडारा जिल्ह्यातील बीएड शासकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

101

प्राध्यापकाकडून सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग

भंडारा जिल्ह्यातील बीएड शासकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

प्राध्यापकाकडून सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग भंडारा जिल्ह्यातील बीएड शासकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा शहरातील शासकीय बीएड महाविद्यालयात कार्यरत असेलया एका प्राध्यापकानं सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भावी शिक्षक घडविणाऱ्या पवित्र महाविद्यालयातच हा संपूर्ण प्रकार घडल्याने शैक्षणिक वर्तुळासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पिडीत महिला प्राध्यापकाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी संशयित आरोपी प्रध्यापकाविरुद्ध कलम ३५४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. १४ मार्च २०२४ रोजी दुपारी महाविद्यालयाच्या स्टाफची बैठक सुरू असताना हा प्रसंग घडल्याची माहिती पिडीतेने स्वतः दिली असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.  

*बीएड शासकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस*

विदर्भातील एकमेव शासकीय बीएड महाविद्यालय भंडारा शहरात आहे. दरम्यान या महाविद्यालयात कार्यरत महिला सहायक प्राध्यापिकेचे पती हे मिझोराम येथे आर्मीत देश सेवा करीत आहे. तर पीडित महिला प्राध्यापिका या त्यांच्या एका मुलीसह भंडाऱ्यात राहतात. १४ मार्चच्या २०२४ रोजी दुपारी महाविद्यालयाच्या स्टॉपची बैठक सुरू असताना हा प्रसंग घडल्याची माहिती पिडीतेने स्वतः पत्रकार परिषदेत सांगितली आहे.

घटनेतील प्राध्यापकाने पीडित महिला प्राध्यापिकेच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. प्राध्यापकाच्या अचानक अशा वागण्याने पीडित महिला भांबावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस ठाणे गाठत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सध्या भंडारा पोलीस करीत आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.