राजेश बेले यांच्या प्रचारार्थ माजी पोलीस अधीक्षक अब्दुर रहमान चंद्रपुरात
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 14 एप्रिल वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ सोमवार , 15 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे.. गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत हा रोड शो होणार आहे. रोड शो नंतर सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभा होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारारार्थ चंद्रपूर मध्ये काही काळ सेवा दिलेले माजी पोलीस अधीक्षक अब्दुर रहमान या प्रचार सभेला संबोधित करणार आहेत.
तरी या रोड शो ला हजारोच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन राजेश बेले यांनी केले आहे.