रायगडचा पारा चढला.. वाढत्या उष्णतेमुळे म्हसळेकर हैराण नागरीकांनी काळजी घ्यावी शक्यतो दुपारी बाहेर पडु नये जिल्हाधिकारी यांचे नागरीकांना आवाहन.

रायगडचा पारा चढला.. वाढत्या उष्णतेमुळे म्हसळेकर हैराण नागरीकांनी काळजी घ्यावी शक्यतो दुपारी बाहेर पडु नये जिल्हाधिकारी यांचे नागरीकांना आवाहन.

रायगडचा पारा चढला.. वाढत्या उष्णतेमुळे म्हसळेकर हैराण

नागरीकांनी काळजी घ्यावी शक्यतो दुपारी बाहेर पडु नये जिल्हाधिकारी यांचे नागरीकांना आवाहन.

रायगडचा पारा चढला.. वाढत्या उष्णतेमुळे म्हसळेकर हैराण नागरीकांनी काळजी घ्यावी शक्यतो दुपारी बाहेर पडु नये जिल्हाधिकारी यांचे नागरीकांना आवाहन.

✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा:मार्च महिना सुरु होताच खर्‍या अर्थाने उन्हाळा सुरु झाला असून, त्यात ढगाळ वातावरण यामुळे तापमानाचा पारा प्रचंड चढला आहे.काही ठिकाणी माणगाव, महाड ईथे तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या,दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, उष्णतेपासून थंडावा मिळावा यासाठी दही,ताक, शीतपेय, कलिंगड यांना म्हसळेकर अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे,
वाढते प्रदूषण, प्रचंड वृक्षतोड व लावण्यात येणारे वणवे यामुळे जंगले ओस पडू लागली असून, यामुळे दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या वातावरणामुळे नागरिक पूर्णपणे हैराण झाले असून.
चार-पाच दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत असून, यामुळे रस्तेही आग ओकताना दिसत आहेत, म्हसळेकर शक्यतो दुपारी घराबाहेर पडणे टाळत आहेत.सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात राहणे पसंत करीत आहेत.दाहक परिस्थितीचा बचाव करण्यासाठी नागरिक थंडगार लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस,ताक, कलिंगड याचा आधार घेत आहेत, ऐन लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराने रायगड जिल्ह्याचा पारा चढला असतानाच.. उष्णतेच्या लाटेमुळे रायगड चा पारा देखील चढला आहे, उन्हाच्या झळांनी जिल्हा चांगलाच तापला आहे. मंगलवार व बुधवार मुंबईसह रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उष्मघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
—————————————
उष्णतेच्या लाटेमुळे लहान मुले व वयोवृद्ध यांच्या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. सुती कपडे परिधान करणे, हलका आहार, फळे, भरपूर पाणी प्यायला पाहिजे, छत्री, टोपी, गॉगल, बुट, महिलांनी स्कार्फ, या सर्व गोष्टींचा समावेश करुन घराबाहेरील पडावे,तसेच उष्माघाताने चक्कर येणे,शरीराचे तापमान अधिक वाढणे,जास्त प्रमाणात घाम येणे असे समस्या निर्माण झाली असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे.
डॉ. महेश मेहता.
वैद्यकीय अधिक्षक, म्हसळा.