गोरेगावं बजरंग दल यांच्या माध्यमातून श्रीराम नवमी उत्सव मोठया जल्लोषात साजरी असंख्य श्रीराम भक्तांची अलोट गर्दी

गोरेगावं बजरंग दल यांच्या माध्यमातून श्रीराम नवमी उत्सव मोठया जल्लोषात साजरी असंख्य श्रीराम भक्तांची अलोट गर्दी

गोरेगावं बजरंग दल यांच्या माध्यमातून श्रीराम नवमी उत्सव मोठया जल्लोषात साजरी असंख्य श्रीराम भक्तांची अलोट गर्दी

गोरेगावं बजरंग दल यांच्या माध्यमातून श्रीराम नवमी उत्सव मोठया जल्लोषात साजरी असंख्य श्रीराम भक्तांची अलोट गर्दी

✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव विभाग प्रतिनिधी
📞संपर्क-७०२११५८४६०

गोरेगावं माणगांव – दि. १९ एप्रिल २०२४, गोरेगांव येथे बजरंग दल गोरेगांव लोणेरे विभाग आणि श्रीराम नवमी उत्सव समितीचे वतीने पाहिले श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामांच्या जयंतीनिमित्त गोरेगांव नागरीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या अधिक होती. श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचे चरणस्पर्श करण्यासाठी, त्यांची आरती करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता.
बजरंग दल रायगड जिल्हा संयोजक आदित्य रमेश गोरेगांवकर, बजरंग दल गोरेगांव संयोजक विशाल रामचंद्र भूस्कुटे, निरंजन बामनोलकर, रितेश निवाते, आनंद राजभर, हरेश शेठ, गौतम जैन यांनी या उत्सवासाठी अहोरात्र श्रम केले असून भव्य मिरवणूकीने संपूर्ण गोरेगांव शहर राममय झाले. बजरंग दल कार्यकर्ते “अयोध्या में जन्मे दशरथ के ललनवा…मेरी रामजी की सेना चली…एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए…भैरोबा तू है भैरवनाथ, उतारे तेरी आरती..हम” अश्या भक्तीगीतांमध्ये तल्लीन झाले. संपूर्ण अयोध्यानगरी गोरेगांव शहरात उतरल्याचा भास होत होते.
रथ, श्रीरामांची भव्य मूर्ती, खालू बाजा, भगवे ध्वज, डि. जे., फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रभू श्रीरामाची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. स्त्री-पुरुषांनी घराबाहेर पडून आपल्या आराध्य श्रीरामांचे दर्शन व आरती केली. मिरवणुकीच्या स्वागतासाठी महिला व पुरुषांनी आपापल्या घराच्या दारात रांगोळ्या काढल्या, आरत्या सजवल्या आणि भक्त भगवान आणि आराध्याचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते.
रामचरितमानस, आरती, सोहरगीत, प्रसाद, रथ शोभायात्रेचे २४ तास अखंड पठण करून श्रीराम नवमी उत्सवाची सांगता झाली. यावेळी शिवसेना पक्ष प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले, महिला व बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे, महाड नगराध्यक्षा स्नेहल ताई जगताप, रायगड जिल्हा महिला संघटीका डॉ. स्वीटी गिरासे, माजी उपसरपंच चंद्रकांत गोरेगांवकर, उपसरपंच दिनेश उचाटे, शिवसेना माजी शहरप्रमुख जगदीश दोशी, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत यादव, उद्योजक दिनेश हरवंडकर आणि पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.