दिकुंडवार सर क्लासेस च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

दिकुंडवार सर क्लासेस च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

दिकुंडवार सर क्लासेस च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मो.9923358970

कोरपना :- येथील दिकुंडवार सर इंग्लिश ट्युशन क्लासेस च्या वतीने इयत्ता दहावी मध्ये यावर्षी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजूभाऊ धावंजेवार उपस्थित होते. यावर्षी इयत्ता दहावी मध्ये 85.20% घेऊन उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पियुष कैलास पारखी तसेच सक्षम आनंद भोगडे ८०.६०% .विशेष अशोक भंडारवार ८१.२०% यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी ‘ ‘ ‘विद्यार्थ्यांचे भवितव्य हे शिक्षकाच्या हाती असते तेव्हा विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन यश संपादन करावेत ‘ असे उद्गार राजूभाऊ धावजेवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिकुंडवार सर यांनी केले