पुण्यश्लोक अहित्या देवी होळकर यांची म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत त्रिशताब्दि जयती साजरी .
✍️संतोष उद्धरकार.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:शुक्रवार दि .३१ मे २०२४ रोजी म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयांत पुण्यश्लोक अहित्या देवी होळकर यांची त्रिशताब्दि जयंती साजरी करण्यांत आली,यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय खांबेटे, खजिनदार सुनिल उमरोटकर, सदस्य पांडुरंग पाटील,मा.सभापती महादेव पाटील, निवृत्त वन अधिकारी बाळकृष्ण गोरनाक, कृषिपर्यवेक्षक सुजय कुसळकर विनोद सोनावणे,के.पी.कुरकुरे, सुशीलकुमार गाडगे,धनंजय सरनाईक, नरेश जामकर,परेश नाक्ती,सायली चोगले, प्राची मेंदडकर. आदी उपस्थित होते . यावेळी ग्रंथ भरवलेल्या प्रदर्शनांत सती साध्वी देवी अहिल्या, लोकमाता, कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर, राजयोगिनी अहिल्याबाई होळकर, पुण्य. अहिल्यादेवी होळकर, भारतीय स्त्री रत्न, अहिल्याबाई होळकर. महाराणी अहिल्याबाई होळकर आशी विविध पुस्तके ठेवण्यात आली होती,संस्था राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांचे उपस्थितानी कौतुक केले .