मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ… और एक बार मोदी सरकार
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदी
कार्यकर्त्यानी फटाक्याची आतशबाजी करुन व मिठाई वाटुन केला आनंद साजरा
✍️ संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा: मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ.. नरेंद मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदी शपथ घेतली. यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला, म्हसळा तालुक्यातील भापजच्या कार्यकर्त्यांनी देखील ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून व एकमेकांना मिठाई भरवुन आनंद साजरा करून सगळीकडे मिठाई वाटण्यात आली, तसेच कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा जयघोष देखील केला.भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वात एनडीएचे ही सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झाले आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. म्हसळा शहरात आनंद साजरा करीत असताना भाजपच्या कार्यकर्त्यानी ३२ रायगड लोकसभा महायुतीचे विजयी उमेदवार सुनिल तटकरे यांचा देखील जयजयकार करून अभिनंदन करून धन्यवाद मानले. यावेळी उपस्थित म्हसळा भाजपा तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील, तालुका सरचिटणीस महेश पाटील, समीर धनसे, महिला तालुका अध्यक्षा रेखा धारिया, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सुनंदा पाटील, करुणा करडे, अपर्णा ओक, धनश्री मुंडे, कांबळे, सुषमा चांदोरकर, वाळवटकर, शहर अध्यक्ष प्रसन्ना निजामपुरकर, माजी उपतालुका अध्यक्ष भालचंद्र करडे, म्हसळा टाईम्स संपादक रमेश पोटले, मनोहर जाधव, किशोर खारगावकर, विवेक ढवळे, योगेश महागावकर, काशिनाथ गाणेकर, निळकंठ गाणेकर, हर्षद पोतदार, श्रवण कोकचा, तुकाराम जोशी, धर्मा पाटील, अथर्व चाळके, तसेच असंख्य कायकर्ते उपस्थित होते.
…………………………………..,..
आमच्या सर्व कार्यकर्ते यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. व तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहूमान मिळाला आहे ही आमच्या साठी खुप अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही मिठाई वाटून व फटाके फोडुन आनंद साजरा केला आहे.
तुकाराम पाटील
भाजप म्हसळा तालुका अध्यक्ष.