बामणी प्रोटिन्सच्या कामगारांना न्याय द्या : डॉ.अभिलाषा गावतुरे
• आंदोलनस्थळी भेट देत कामगारांना पाठींबा दर्शविला

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 13 जून
मागील 24 दिवसापासून बामणी येथील बामणी प्रोटीन्स लिमिटेडच्या कामगारांचे आंदोलन सुरू आहे.
बामणी येथील बामणी प्रोटिन्स लिमिटेड हा उद्योग वर्ष 1998 पासून चालू आहे जवळपास अडीचशे ते ३०० स्थायी कामगार या उद्योगाद्वारे आपला उदरनिर्वाह करीत होते मात्र पर्यावरणवादी राजेश बेले यांच्या प्रदूषण विषयक तक्रारीवरून प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी 13 मार्च 24 रोजी हा उद्योग लॉक आउट कारवाई द्वारे बंद केला त्यात रीतसर सुधारणा करून उद्योग पूरक करण्याचे निर्देश दिले मात्र बामणी प्रोटीन्स लिमिटेड द्वारे यावर कोणतीही हालचाल करण्यात आली नाही.
त्यानंतर कंपनी व्यवस्थापना तर्फे प्रदूषण विषयक सुधारणा केल्यानंतर उद्योग सुरू करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता व्यवस्थापनाने नफ्यात असलेला उद्योग आर्थिक व तांत्रिक दृष्ट्या चालण्यास असमर्थ असल्याचे कारण सांगून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला यामध्ये कामगारांची कोणतीही चूक नसताना त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यामध्ये कामगारांना आणि कामगार युनियनला विचारात न घेता कंपनीने जो एकतर्फी निर्णय घेऊन कंपनी बंद केली
हा अतिशय अन्यायकारक निर्णय आहे. याकरिता आंदोलनाला समाजसेवी, बालरोग तज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी कामगारांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला.
आधीच नागरिकांना हाताला काम नाही त्यात एखादा सुरू असलेला उद्योग प्रकल्प अशा पद्धतीने बंद होत आहे ही अतिशय गंभीर बाब असून गेल्या 10 वर्षापासून हे कामगार येथे काम करीत आहे आणि आज 24 दिवस लोटून सुध्दा या कामगारांच्या समस्येवर कुणाचेही लक्ष नाही. सर्व प्रदूषण कारणाची पूर्तता करून देखील कंपनी सुरू होत नाही. यामध्ये कंपनी व्यवस्थापनाने लक्ष देऊन काम पुन्हा चालू करून कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे याचबरोबर मुख्यमंत्री ,उद्योग मंत्री ,पालकमंत्री यांनी जातीने या मध्ये लक्ष द्यावे असे आवाहन डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी केले.








