Home latest News रस्त्यावरील धोकादायक खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करा • बहुजन समाज पक्षाची मागणी

रस्त्यावरील धोकादायक खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करा • बहुजन समाज पक्षाची मागणी

117

रस्त्यावरील धोकादायक खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करा
• बहुजन समाज पक्षाची मागणी

रस्त्यावरील धोकादायक खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करा • बहुजन समाज पक्षाची मागणी

साहिल सैय्यद 🖋️
📲9307948197
घुग्घुस तालुका प्रतिनिधी

घुग्घुस : 14 जून
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. विशेषतः घुग्घुस पोलीस स्टेशन समोरील रस्ता, बँक ऑफ इंडिया समोरील रस्ता , बस स्टँड समोरील रस्ता जास्त क्षतीग्रस्त झाले आहे. आणि हे शहरातील प्रमुख रस्ते असल्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी खूप जास्त त्रास होत आहे . या रस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक जास्त प्रमाणात असल्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील मोठया प्रमाणात वाढले आहे . तरी या समस्येची विशेष दखल घेत शहरातील जीवघेणे खड्डे त्वरित दुरुस्त करून घुग्घुस वासियांना न्याय द्यावा असे निवेदन शुक्रवार, १४ जून रोजी मुख्याधिकारी, नगरपरिषद घुग्घुस यांना बहुजन समाज पक्षाच्या वतीने देण्यात आले.
या वेळी बहुजन समाज पार्टीचें घुग्घुस शहर अध्यक्ष सिध्दार्थ कोंडागुर्ला, शहर उपाध्यक्ष सुमेध पाटिल, शहर महासचिव आकाश गेडाम व इतर बसपा कार्यकर्त्याची उपस्थिती होती.