Home latest News वेकोली वसाहतीत दोन दशका पासून राहणाऱ्या नागरिकांचे क्वार्टर खाली करू नये ...

वेकोली वसाहतीत दोन दशका पासून राहणाऱ्या नागरिकांचे क्वार्टर खाली करू नये खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना काँग्रेस नेते अनुप भंडारी यांची निवेदनातून मागणी

121

वेकोली वसाहतीत दोन दशका पासून राहणाऱ्या नागरिकांचे क्वार्टर खाली करू नये

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना काँग्रेस नेते अनुप भंडारी यांची निवेदनातून मागणी

वेकोली वसाहतीत दोन दशका पासून राहणाऱ्या नागरिकांचे क्वार्टर खाली करू नये खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना काँग्रेस नेते अनुप भंडारी यांची निवेदनातून मागणी
साहिल सैय्यद 🖋️
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197

घुग्घुस : शहरात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची विजयी मिरवणूक व नागरी सत्कार कार्यक्रम 19 जून रोजी स्नेहप्रभा मंगल कार्यालय येथे घेण्यात आला याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली इंटक जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी यांनी वेकोलीच्या क्वार्टर मध्ये राहणाऱ्या नागरिकांना क्वार्टर बाहेर काढू नये अश्या स्वरूपाचे निवेदन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना दिले

शहरातील गांधी नगर,सुभाष नगर,शास्त्री नगर येथे गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून वेकोलीचे निवृत्त सेवा कर्मी अथवा काही गोरगरीब गरजवंत नागरिक हे वास्तव्य करीत आहे
सदर क्वार्टर हे सर्व्ह ऑफ झाले असल्याने अनेक नागरिकांनी या क्वार्टरची स्वतः दुरुस्ती करून याठिकाणी वास्तव्य करीत आहे
मात्र सध्या परिस्थितीत वेकोली तर्फे क्वार्टर खाली करण्या संदर्भात हालचाली शुरु झाल्या असून कृपया या पावसाळ्यात नागरिकांचे क्वार्टर खाली करण्यात येऊ नये अशी मागणी काँग्रेस पक्षाचे इंटक जिल्हा उपाध्यक्ष यांनी शिष्टमंडळा निवेदनातून केली आहे
याप्रसंगी शिष्टमंडळात एन.एस.यु.आय अध्यक्ष आकाश चिलका,रफिक शेख,सन्नी मंडल,प्रकाश तांडरा,शरद कुम्मरवार उपस्थित होते