अज्ञान वाहनाच्या धडकेत वाघ जखमी.

111
अज्ञान बाळाच्या धडकेत वाघ जखमी? मात्र घटनास्थळी वाघ आढळून आला नाही.

अज्ञान वाहनाच्या धडकेत वाघ जखमी 

अज्ञान बाळाच्या धडकेत वाघ जखमी? मात्र घटनास्थळी वाघ आढळून आला नाही.

त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी मो 9096817953

भिवापूर : – नागपूर गडचिरोली महामार्गावर भिवापूर जवळील ज्यूस फॅक्टरीजवळ अज्ञान वाहनाने वाघास धडक दिल्याने वाघ गंभीर जखमी झाला पण जखमी अवस्थेत तो वाघ काही लोकांनी पाहिले व ही माहिती इतर गावकऱ्यांना सांगितल्याने शहरातून घटनास्थळा कडे धाव घेतली पण त्या नागरिकांना जखमी वाघ बघण्यासाठी मिळाला नाही . ही घटना आज सकाळी  साडेसहा  च्या सुमारात घडली असावी अशी चर्चा नागरिकांत व्यक्त होत आहे. मात्र सकाळी 7.15 वाजता भिवापूर पोलिसांना ही माहिती मिळाली असता पोलीस पथक व डॉ. रवी जाधव घटनास्थळी गेले असता फक्त त्यांना नागरिकांची गर्दीच दिसली. पण जखमी वाघ त्यांना दिसला नाही म्हणून पोलीस पथकाने वाघाचा शोध सुरु केला त्यांच्या सोबत गावातील नागरिकांनी रस्त्याच्या आजू बाजूला शोध घेत होते पण वाघ दिसला नाही . या घटनेची माहिती मिळताच उमरेड वरून वनपरिक्षेत्र अधिकारी गजरे मॅडम वन विभागाच्या टीम सोबत घटनास्थळी निघाल्या  वृत्त लिहेपर्यंत वाघाचा पत्ता लागला नाही पुढील तपास पोलीस पथक व वन विभाग अधिकारी करीत आहेत .