रात्रीच्यावेळी हातात लोखंडी कटावणी ; चोरीसाठी होतोय अल्पवयीन मुलांचा वापर 

रात्रीच्यावेळी हातात लोखंडी कटावणी ; चोरीसाठी होतोय अल्पवयीन मुलांचा वापर 

रात्रीच्यावेळी हातात लोखंडी कटावणी ; चोरीसाठी होतोय अल्पवयीन मुलांचा वापर 

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

नेरळ: – कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात विस्मयचकित करणाऱ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत . कर्तव्यदक्ष पोलिसांनी तब्बल १२ तासांच्या आत या चोऱ्यांचा तपास करून शोध घेतला असला तरी त्यात ५ अल्पवयीन मुले या प्रकरणात असल्याने आश्चर्य व्यात होत असून चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होणे ही धक्कादायक बाब समोर येत आहे.

लहान मुले असल्याने त्यांना कठोर शिक्षा होत नाही तर त्यांची रवानगीही सुधारण्यासाठी रिमांड होम येथे होते. कारण कायद्यामध्ये तशी प्रक्रिया आहे त्यामुळे अल्पवयीन मुलांचा वापर सर्रास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

 नेरळ सम्राटनगर येथील मोईनुद्दिन तय्यबअली मोमीन, वय-४५ वर्षे, सध्या रा. साईधाम निवास सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. नेरळ, रुम नं.१०१, पहिला मजला, ता. कर्जत हे दोघे पती-पत्नी जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहेत व ते दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी त्यांचे घर बंद करून कुटूंबियांसह बार्शी, जि. सोलापूर येथे गेले होते व दिनांक ०८ सप्टेंबर २०२४ रोजी सम्राटनगर नेरळ येथे त्यांच्या शेजारी राहणा-यांनी त्यांना फोन करुन त्यांच्या रुमच्या दरवाजाची कडी तोडलेली आहे व बेडरुम मधील कपाट उघडे असून सामान अस्ताव्यस्त असल्याचे मोबाईलवरून कळविले. त्यावरून चोरी झाल्याचे निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार मोईनुद्दिन यांनी फिर्याद दिल्यानंतर नेरळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

              चोरीच्या फिर्यादीनुसार बी.एन.एस.२०२३ चे कलम ३०५ (अ),३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी यांचे सोन्याचे सुमारे ८ तोळे व चांदीचे १८० ग्रॅम वजानाचे दागीने व रोख रक्कम ८५,०००/रुपये चोरीला गेली होती. या गुन्हयाच्या  तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किसवे व त्यांच्या पथकातील अंमलदारांना समक्ष सुचना व मार्गदर्शन केले.

गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार बेद्रे/४६७ व वांगणेकर/१४१५ यांनी घटनास्थळावरील येण्याजाण्याच्या मार्गावरील सी.सी.टी.व्ही. कॅमे-याचे फुटेज पाहिले असता रात्रीच्या वेळी हातात लोखंडी कटावणी घेवून जाणा-या इसमाची माहिती मिळाली त्याचे नाव पत्ता निष्पन्न करुन त्याच्या इतर साथीदारांची  नावे समजल्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. आरोपी २४ वर्षेचा असून तो धामोते, आदिवासीवाडी नेरळ येथील रहिवाशी आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुले सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर विधीसंघर्षीत बालक व आरोपी  संजय नारायण दळवी यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.

आणखी एका विधिसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ८ तोळयाचे सोन्याचे दागीने, १८० ग्रॅम वजनी चांदीचे दागीने व रोख रक्कम ८५,०००/रु. असा एकुण सहा लाख बावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी संजय नारायण दळवी यास न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

        नेरळ शहरात ११ सप्टेंबरच्या मध्यरात्री आणखी एक चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी त्याचाही तपास लावला. त्या चोरीतही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. नेरळ बाजारपेठेतील मशिदीजवळ मुजाहिद खोत यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. चोरीबाबत नेरळ पोलीस ठाण्यात बी.एन.एस.कायदा २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१ (४),६२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटना सी.सी.टी.व्ही मध्ये कैद झाली होती त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहुन ४ आरोपी असल्याची खात्री केली. सदर आरोपी अंबरनाथ, उल्हासनगर येथील राहणारे असल्याचे तांत्रिक तपासाद्वारे निष्पन्न झाले.आरोपींपैकी ३ विधिसंघर्षग्रस्त बालक असुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचा मुख्य म्होरक्या फरारी आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

         वरीलप्रमाणे नेरळ पोलिसांनी २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. पोलीस अधीक्षक सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी.टेळे,नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे, पोहवा /२३८४ सचिन वाघमारे, पोहवा /१००४ दत्तात्रय किसवे, पोशि/१८३६ राजेभाऊ केकाण, पोशि/४६७ बेंद्रे, पोशि/३०५ निरंजन दवणे, पोशि/१४१५ विनोद वांगणेकर यांनी १२ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणण्याची कामगीरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here