जळगाव शहरातील दुचाकी व मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक
✍️ विशाल सुरवाडे ✍️
जळगाव ब्युरो चीफ
📱 मो.9595329191 📱
*जळगाव*: – जळगाव शहरात १) अफजलखान पठाण(वय 23 रा. खुबचंद साहित्य नवीन कॉम्प्लेक्स हुडको पिंप्राळा ता. जि. जळगाव) २) शेख आवेश शेख मोहम्मद (वय 21 रा. आझाद नगर पिंप्राळा हुडको असे मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपींची नाव आहे.
हे मोटरसायकल चोरी करत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती मिळाल्याने त्यांनी पो. उपनिरी. दत्तात्रय पोटे, सफौ. रवी नरवाडे,सफौ संजय हिवरकर,सफौ संगपाल तायडे, पोहेकॉ. मुरलीधर धनगर,पोहेकॉ हरिलाल पाटील, पो.ना. प्रवीण भालेराव यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांचा शोध घेत असताना ही दोघं पिप्राळा हुडको भागात मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शोएब पठाण याने जळगाव शहरात कोर्ट चौकातून ज्युपिटर कंपनीची मोटरसायकल तसेच सुभाष चौक जळगाव येथून एचएफ डीलक्स कंपनीची मोटरसायकल व नेहरू चौक जळगाव येथून बजाज कंपनीची प्लेटिना मोटरसायकल तसेच खोटे नगर भागातून एक घरातून दिवसा सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा मोबाईल चोरी केली बाबत त्यांनी कबुली दिली आहे.सदर चोरी केलेली दोन मोटार सायकल व मोबाईल शेख आवेश याला विक्री केल्याबाबत कबुली दिली आहे. एक मोटर सायकल अल्तमेश सलीम राहणार पिंप्राळा हुडको याला विक्री केले असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दोन मोटरसायकल व एक मोबाईल जप्त करण्यात आली आहे पुढील तपास जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ भास्कर ठाकरे करीत आहे.
आरोपींनी दोन मोटार सायकल ह्या जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतून , एक मोटर सायकल शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून, व जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून एक मोबाईल चोरी केलेले असून जळगाव शहरातील चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.