बँकेत काम करणाऱ्या 21 तरुणीवर ठेवली वाईट नजर
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
नांद. बँकेत काम करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीवर वाईट नजर ठेऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संचालकाला पोलिसांनी केली अटक
किशोर घरत रा.नांद ता. भिवापुर असे आरोपीचे नाव आहे पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 75, 75(1)78(1) अन्वेय गुन्हा नोंदवित आला काल दुपारी त्याला नांद येथून अटक केली. पीडित नांद पासूनच जवळ असलेल्या एका गावची रहिवाशी आहे.आरोपी किशोर कडे गॅस एजन्सी आहे. नांद येते एजन्सी चे कार्यालय आहे. या कार्यालयातच फिनो पेमेंट
नामक बँकेचे सुद्धा कार्यालय आहे. आरोपी किशोर हा या बँकेचे संचालक आहे. त्याने पिढीत तरुणीला बँकेत कामावर ठेवून तिची व्यवस्थापक या पदावर नियुक्ती केली होती. सुरुवातीपासूनच किशोर ची तिच्यावर नजर वाईट होती. वेगवेगळ्या निमित्ताने तो सतत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. मोबाईल वरती तिला अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवायचा. ते पिढीतेला आवडत नव्हते. परंतु नोकरीची गरज असल्याने ती त्याची
मजनूगिरी खपवून घेत होती. ती विरोध करीत नाही हे बघून आरोपीची हिंमत वाढली. यातूनच तो तिच्याशी लगट करू लागला. त्याचे हे असे वागणे असह्य झाल्याने त्रासून पिढीत युवतीने बुधवारी 2 ऑक्टोंबर ला ही बाब किशोरच्या पत्नीला सांगितली. व 3.आक्टोंबर ला सकाळी ती कार्यालयात काम करीत असताना आरोपी किशोर तिथे आला पत्नीला का सांगितले म्हणून आधी तिच्यावर रागावला. नंतर एकटे गाठून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे कृत्य सहनशक्तीच्या बाहेर गेल्याने तिने लगेच भिवापूर ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. ठाणेदार जयकिशोर निर्मल यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदीप सेडमाके के पुढील तपास करीत आहे.