Nashik 7th grade girl was taken away by a teacher and fled.
Nashik 7th grade girl was taken away by a teacher and fled.

नाशिक 7 वीत शिकणार्‍या मुलीला शिक्षकाने नेले पळून.

नाशिक:- निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे इयत्ता सातवीत शिकणा-या एका मुलीच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीने तिच्या कुटुंबियांना धक्काच बसला आहे. सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे, असे तिच्या हस्ताक्षरातील चिठ्ठीत नमूद केले आहे. कुंदेवाडी ता. निफाड येथे ही घटना घडली आहे. बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असून शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पंकज श्याम साळवे वय 23, रा. कुंदेवाडी, ता. निफाड असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मुलीच्या वडिलाने फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुंदेवाडी येथे सातवीच्या वर्गात मुलगी शिकत आहे. पंकज श्याम साळवे याच्याकडे ही मुलगी दुसरीत असल्यापासून शिकवणीला जात होती. मुलीच्या खोलीत शुक्रवारी तिच्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी आढळली. सर मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात असल्याचे तिने चिठ्ठीत लिहले होते. खात्री करण्यासाठी मुलीचे कुटुंब साळवेच्या घरी गेले, तेव्हा त्याच्या घराला कुलूप असल्याचे लक्षात आल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी साळवे हा एका शाळेत हंगामी शिक्षक आहे. तो देवपूर परिसरात दोनतीन ठिकाणी शिकवण्या घेतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here