आरसीएफ सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण चव्हाण यांची कर्तव्यदक्षता.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: आरसीएफ थळ मधील हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण चव्हाण हे पहिल्या शिफ्टमध्ये प्रशासकीय इन गेटमध्ये तैनात असताना१६/१०/२०२४ रोजी दुपारी १२.२० वाजता रुपये १६, ५००/- इतकी रोख रक्कम गेटजवळ पडलेली त्यांना आढळली. याबाबत त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्ष प्रभारींच्या आदेशानुसार सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक व्यक्ती प्रशासकीय आऊट गेटमधून बाहेर जात असताना पँटच्या खिशातून काहीतरी काढताना पैशाचे पुडके त्या व्यक्तीच्या खिशातून पडले असल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर व्यक्तीच्या हातातील सामानावरुन ती पोस्ट ऑफिस कर्मचारी असल्याची ओळख पटली. त्यानंतर टपाल कार्यालय व पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या अमित भगत या कर्मचाऱ्याला याबाबत माहिती देण्यात आली व सीआयएसएफ उप समादेशक श्री संदीप चक्रवर्ती यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या उपस्थितीत हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण चव्हाण यांनी अमित भगत यांना त्यांचे १६५०० रुपये परत दिले. डेप्युटी कमांडंट श्री.संदीप चक्रवर्ती यांनी हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण चव्हाण यांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले आणि विभागातर्फे त्यांना योग्य तो पुरस्कार देऊन सन्मानित करण्यास सांगितले.