Home latest News आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पो.निरीक्षक नितीन मोहिते यांचे...

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पो.निरीक्षक नितीन मोहिते यांचे आव्हान…

126

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पो.निरीक्षक नितीन मोहिते यांचे आव्हान…

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पो.निरीक्षक नितीन मोहिते यांचे आव्हान...

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

कोलाड : निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर करण्यात आली असून अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही विधानसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शक वातावरण पार पाडण्यासाठी आलेल्या आचारसंहितेचे सर्व जनतेने काटेकोरपणे पालन करावे असे सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या वेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी शिवसेना (उबाठा) , शिवसेना (शिंदे गट) , शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) , भाजप व सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राजकीय पक्षांशी संबंधित जाहिरात फलक, बॅनर, लाऊडस्पिकर यासारखे शासकीय स्वरूपाचे फलक व प्रचार रॅली काढण्याच्या दोन दिवस अगोदर सांगणे मतदानाच्या दिवशी बुथ वरती व मतदान केंद्रात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही. याची खबरदारी घेणे असे कोलाड पो.ठाणे. सहा.पो.निरीक्षक नितीन मोहिते यांनी आव्हान केले..यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कोलाड पो.ठाणे. गोपनीय अंमलदार नरेश पाटील उपस्थितीत होते.