घुग्घूस ते नागपूर यवतमाळ व गोदावरकनी बस शुरु करा

33

घुग्घूस ते नागपूर यवतमाळ व गोदावरकनी बस शुरु करा

भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप भंडारी
यांची नितीन गडकरी यांना निवेदनातून मागणी

साहिल सैय्यद 🖋️/प्रतिनिधि
📲9307948197

घुग्घूस : हा औद्योगिक शहर असून या शहराला मिनी इंडिया असे संबोधित केल्या जाते कारण या शहरात चांदा ते बांदा व काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशातील प्रत्येक राज्यातील नागरीक रोजगारा करीता या शहरात वास्तव्य करीत आहे.
या शहरात विशेषतः सिमावर्ती भागातील तेलगू भाषीकांची संख्या लक्षनीय असून त्यांना लागतच्या तेलगना व आंध्रप्रदेश या राज्यातील नागरिकांना प्रवासाची सोय होत नसल्याने त्यांना खूपच त्रास सहन करावा लागत असल्यामुळे घुग्घूस ते गोदावरकनी बस शुरु करण्यात यावी तसेच शहरातून आधी सकाळी 06 वाजता घुग्घूस ते नागपूर बस फेरी व सांयकाळी नागपूर ते घुग्घूस अशी फेरी शुरु होती ती सध्या बंद झाली असून यवतमाळ ते घुग्घूस व घुग्घूस ते यवतमाळ बस फेरी ही बंद करण्यात आली असून सदर बस सेवा सुरळीतपणे शुरु करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी यांनी देशातील रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनातून केली आहे
ही बस शुरु केल्याने नागरिकांची प्रवास यात्रा सुखद होईल