पुण्यातील तरुणीने तब्बल 16 तरुणांना फसवलं आपल्या जाळ्यात; 15 लाखांहून अधिक किंमतीचा लुटला ऐवज.
लुटल्या गेलेल्या एका तरुणाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला. तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीला पकडण्यासाठी स्मार्ट गेम खेळला आणि ती त्यांच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी तिने लुटलेला सर्व ऐवज जप्त केला आहे. त्याचबरोबर सायलीने ज्या 16 तरुणांना फसवलं त्यापैकी फक्त 4 जणांनीच तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. इतर तरुण बेअब्रू होतील या भीतीने अद्यापही पोलिसांकडे तक्रार द्यायला गेले नाहीत.